पुणे: बंगालच्या उपसागरात सेनयार नावाचे चक्रीवादळ बुधवारी सकाळी तयार झाले. ते इंडोनेशिया बेटांपासून जवळ आहे. मात्र भारतीय किनारपट्टीला फारसा धोका नाही. तसेच राज्यातही पावसाची शक्यता नाही मात्र बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थंडीत घट होवून २९ पर्यंत उबदार वातावरण राहील.
गत दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचे बुधवारी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे वादळ इंडोनेशिया जवळ असून, २७ नोव्हेंबरपर्यंत सक्रीय राहणार आहे. त्यामुळे उपसागर खवळलेला राहणार आहे.
असा राहील प्रवास...
नैऋत्य बंगालचा उपसागर, आग्नेय श्रीलंका आणि विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या लगतच्या भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र २६ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार त्याच प्रदेशात कायम राहिले.
हे चक्रीवादळ समुद्रसपाटीपासून सरासरी ७.६ किमीपर्यंत पसरले आहे. पुढील २४ तासांत ते जवळजवळ उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर, ते आणखी तीव्र होण्याची आणि पुढील ४८ तासांत नैऋत्य बंगालच्या उपसागरातून उत्तर-वायव्येकडे उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरी किनाऱ्यांकडे सरकण्याची शक्यता आहे.
राज्यात राहणार उबदार वातावरण...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालेले असले तरीही राज्यात मात्र कोरडे वातावरण राहणार आहे. मात्र चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त वारे येत असल्याने ढगाळ वातावरण राहील. पावसाची मात्र शक्यता नाही.
राज्याचे बुधवारचे किमान तापमान....
पुणे १५.९, अहिल्यानगर १५.३, जळगाव १७.५, कोल्हापूर १८.४, मालेगाव १७.२, नाशिक १६.९, सातारा १६,