मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकास आराखड्याअंतर्गत सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देण्यासाठी मंदिर पुढील तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत स्थानिक ग््राामस्थांनी एकमुखी सहमती दर्शविली आहे. ज्योतिर्लिंगाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रद्धा आणि प्रशासन यांचा समन्वय साधत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता जिल्हाधिकारी मंदिर केव्हापासून बंद ठेवणार याची अधिकृत माहिती देतील, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 23) सांगितले.
आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पार पडली. बैठकीत प्रशासन, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग््राामस्थ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. विकासकामे सुरळीत, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक असल्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले.
बैठकीनंतर प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग््राामस्थांच्या वतीने मंदिर परिसर, पायरी मार्ग, बसस्थानक व वाहनतळाची संयुक्त पाहणी करण्यात आली. या बैठकीस खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, आंबेगावचे तहसीलदार डॉ. सचिन वाघ, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, निगडाळेच्या सरपंच सविता तिटकारे यांच्यासह स्थानिक ग््राामस्थ, देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
बंद काळात विशेष खबरदारी
बैठकीत स्पष्ट केले की, प्रशासकीय अधिकारी भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट व स्थानिक ग््राामस्थांचे म्हणणे, तसेच बैठकीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी मंदिर बंद ठेवण्याबाबत अधिकृत आदेश काढणार आहेत. बंद काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणालाही दर्शन नाही
या बंद कालावधीत मंदिरात स्थानिक ग््राामस्थ, बह्मवृंद, गुरव पुजारीबांधव, प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी दर्शनासाठी कोणताही आग््राह धरू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विकासकामांच्या दृष्टीने सर्वांनी संयम आणि सहकार्य दाखवावे, असे आवाहन करण्यात आले.