Wedding Pudhari
पुणे

Baramati Wedding Ceremonies: बारामती तालुक्यात ‘12-12, 13-12’ मुहूर्तावर विवाहसोहळ्यांची धामधूम

शहर-ग्रामीण भागातील मंगल कार्यालये हाऊसफुल्ल; दोन दिवसांत लग्नोत्सवाची लाट

पुढारी वृत्तसेवा

बारामती: 12-12, 13-12 या तारखांचा शुभमुहूर्त साधत शुक्रवारी व शनिवारी बारामती शहर, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडले. या दोन दिवशी मोठ्या संख्येने लग्ने ठरल्याने शहरातील व ग््राामीण भागातील सर्वच मंगल कार्यालये, लॉन्स व हॉल्स पूर्णतः भरले होते. अनेक ठिकाणी एकाच वेळी दोन ते तीन विवाह सोहळे होत असल्याचे चित्र दिसून आले.

मंगल कार्यालयांसह काही कुटुंबांनी घरगुती पद्धतीने तसेच मंदिरांमध्येही विवाह सोहळे पार पाडले. सकाळपासूनच बारामती शहर व तालुक्यात लग्नाच्या वरात्या, वाजंत्री, फुलांची सजावट आणि पाहुण्यांची वर्दळ यामुळे उत्साहाचे वातावरण होते. वाहनांची वाढलेली वर्दळ, फुलविक्रेते, केटरिंग व्यावसायिक, छायाचित्रकार व वाजंत्री यांच्यासाठी हा दिवस चांगला व्यवसाय देणारा ठरला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते विवाह समारंभांना आवर्जून उपस्थित राहिले, तर बारामती शहरात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण असल्याने पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते व समर्थकांच्या आमंत्रणांना मान देत विवाहांना हजेरी लावली. त्यामुळे अनेक विवाह समारंभांमध्ये राजकीय नेत्यांचीही उपस्थिती दिसून आली.

एकंदरीत, 12-12 व 13-12 च्या शुभमुहूर्ताने बारामती परिसरात विवाहोत्सवाचीच लाट आली होती. आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणात दिवसभर नवदांपत्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला. लग्न समारंभ आता साध्या पद्धतीने होत नसून मोठ्या प्रमाणात खर्चिक बनला असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली. शहर व तालुक्यातील रस्त्यांवर वाहनांची सर्वाधिक गर्दी या दोन दिवसांत पाहायला मिळाली. अनेक मंगल कार्यालयांची पार्किंग अपुरी पडली. मिळेल तेथे वाहने लावत नागरिकांनी वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

वाजंत्रींसह भटजींचीही पळापळ

12-12 आणि 13-12 या शुभमुहूर्तावर अनेकांनी विवाह समारंभाचे आयोजन केल्याने वाजंत्री, सनई-ताफावाले, हलगीवाले, घोडे मालक आणि भटजींसह आचार्‌‍यांचीसुद्धा धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने असलेली मागणी लक्षात घेता या मंडळींनी दोन, तीन ठिकाणच्या सुपाऱ्या घेतल्या होत्या. विवाहमुहूर्तामध्ये अर्धा तास ते दीड तासापर्यंत अंतर होते. परिणामी या मंडळींनी पळापळ करत दुसऱ्या ठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी त्यामुळे विवाह सोहळ्याला काहीसा विलंबही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT