लोणी-धामणी: मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने ग््राामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांदळेवाडी परिसरात पिंपळवाडी रस्ता-धरणवस्ती, झंजळ डोंगरभाग, ऊंबरखोरी आणि ढगेवस्ती परिसरात बिबट्याचा वावर आहे. येथे अनेकदा बिबट्या पाहिल्याचे स्थानिक ग््राामस्थ सांगतात. एक महिन्यापूर्वी ढगेवस्ती येथील शेतात काम करताना मजुरांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले. झंजळ येथील बोत्रे-शिंदेवस्ती येथून दोन आठवड्यापूर्वी सायंकाळी पाच वाजता बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. तर, आठ दिवसांपूर्वी बंगेवस्ती-कान्होबा मंदिर येथे दोन बिबट्यांनी तीन शेळ्यांवर हल्ला केला. त्यातील एका शेळीला जागीच ठार केले, तर दोन बिबटे दोन शेळ्यांना घेऊन गेले.
या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने एक महिन्यापूर्वी पिंजरा लावला आहे. मात्र, या पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकलाच नाही. या भागात जवळ जवळ पाच-सहा बिबट्यांचा वावर असल्याचे ग््राामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी मोडळ येथील रानातून बिबट्या शेळी घेऊन गेला, तर एक लाल गायीचे वासरू ठार केले.
येथील डोंगरभागात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने शेतकरी आपली जनावरे व शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी नेतात. आता येथे बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. जनावरांची राखण करायची का स्वत:चा जीव वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सध्या भीमाशंकर साखर कारखान्याची ऊसतोड सुरू असल्याने बिबट्याची दडण कमी झाली आहे. त्यामुळे बिबटे या डोंगरभागातील झाडाझुडपांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शेतात काम करताना, जनावरे व शेळ्या, मेंढ्या चारताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहान वन विभागाच्या वतीने केले जात आहे.
दुसरीकडे, येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याचे कळवूनही वन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आता मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता बिबट्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा आक्रमक पाऊल उचलू, असा इशारा ग््राामस्थांनी दिला आहे.