

बारामती: बारामती शहर व परिसरातील सार्वजनिक ठिकाणाहून, बाजारातून गहाळ झालेल्या 27 मोबाईल संचांचा शहर पोलिसांनी शोध घेतला. सुमारे 4 लाख 5 हजार रुपये इतकी या मोबाईलची किंमत आहे.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी गहाळ झालेले, चोरीला गेलेल्या मोबाईल संचांचा शोध घेण्यात यावा असे आदेश पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना दिले होते.
त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश राऊत, अंमलदार अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, सागर जामदार, अक्षय सिताप, विशाल शिंदे, गिरीश नेवसे, विशाल चौधर, पोपट कवितके, वैभव मदने, अमोल देवकाते यांनी हे मोबाईल शोधून काढले. त्यासाठी राज्याच्या विविध भागांसह परराज्यात या पथकाने शोधमोहीम राबविली.
सतीश झगडे (रा. बारामती), अमोल साळवे (रा. आमराई, बारामती), नंदकुमार साठे (रा. देवळे पार्क, बारामती), ऋतुजा भुजबळ (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), संदीप बनसोडे (रा. काझड, ता. इंदापूर), संदीप भारती (रा. बारामती), दादासाहेब पवार (रा. अहिल्यानगर), अविनाश लोंढे (रा. बारामती), उमेश दानोळे (रा. गुणवडी रोड, बारामती), गणेश दंडाले (रा. शेवाळवाडी, पुणे), शिरीन बागवान, विनोदकुमार साळुंखे (रा. कसबा, बारामती), विकास सावंत (रा. कुरवली, ता. इंदापूर), ऋतुजा शिंगाडे (रा. सूर्यनगरी, बारामती).
लक्ष्मी आगम (रा. शारदानगर), दीपक मोरे (रा. मळद, बारामती), सोनाली माने (रा. गुळुमकरवस्ती, फलटण रोड, बारामती), विनोद शिंदे (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर), सोनाली तांबे (रा. विजयनगर, बारामती), हनुमंत सावंत (रा. मेखळी, बारामती), स्मिता कवडे (रा. बारामती), अश्विन कांबळे (रा. मळद, बारामती), अजिक्य कांबळे (रा. खांडज), रंजना चक्रनारायण (रा. बारामती), विवेक टांकसाळे (रा. काटेवाडी, बारामती), महादेव सावंत (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) या मूळ मालकांनी हे मोबाईल न्यावेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी केले आहे.