पुणे

महापालिकेची सर्व रुग्णालये ओक्सिजनसह सज्ज

backup backup

पिंपरी : मिलिंद कांबळे : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी असून, दररोज 40 ते 60 रुग्ण दररोज आढळून येत आहेत.

ओमायक्रॉनबाधित 12 रुग्ण आढळून आले आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेची सर्व रुग्णालये ऑक्सिजनपुरवठ्यासह सज्ज आहेत.

विविध रुग्णालयांत सहा टँक असून, 131 केएल ऑक्सिजनची साठवणूक क्षमता आहे. तर, एकूण 4 हजार 380 एलएमपी क्षमतेचे प्लांट आहेत.

कोरोनाच्या पहिला व दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. तसेच, व्हेंटीलेटर्स व आयसीयू बेडची संख्याही अल्प होती.

त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने शहराची परिस्थिती बिघडली होती. महापालिकेने तातडीने उपाययोजना करीत पालिकेचे रुग्णालये व तयार असलेली रुग्णालयाने पूर्ण क्षमेते कार्यान्वित करून ऑक्सिजनने सज्ज केली आहेत.

वायसीएम, थेरगाव, आकुर्डी, भोसरी, जम्बो, ऑटो क्लस्टर, जिजामाता, तालेरा ही रुग्णालये ऑक्सिजन साठ्यासह परिपूर्ण झाले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेडची संख्या 2 हजार 725 इतकी वाढली आहे. व्हेंटीलेटरर्स 396 आहेत. तर, आयसीयू बेड 692 आहेत.

संसंर्ग वाढून रुग्ण संख्या वाढल्यास त्यानुसार बेडची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. तसेच, कोविड केअर सेंटर व डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची संख्याही मोठी आहे. रुग्णालयांसाठी डॉक्टर, परिचारिका व मेडिकल स्टॉफची संख्या वाढविण्यात आली आहे.

वायसीएम रुग्णालयात 10 केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीसाठी 1 टँक उभारण्यात येणार आहे. तसेच, जुने भोसरी रुग्णालयात 710 एलएमपी आणि नवीन तालेरा रूग्णालयात 960 एलएमपी क्षमतेचे असे एकूण 1 हजार 670 क्षमतेचा प्लॉट सीएसआर निधीतून उभा केला जाणार आहे.

ऑक्सिजन सिलेंडरची संख्या 1 हजार 120

रुग्णालयातील पीएसए ऑक्सिजन प्लांटची संख्या 2 हजार 460 एलपीएम इतकी आहे. रुग्णालयीन जनरेशन 20 टक्के होते. तर, रुग्णालयीन साठवणूक क्षमता 80 टक्के आहे. त्यात ऑक्सिजन सिलेंडरची संख्या 1 हजार 120 आहे. क्रायोजनिकचे 7 टॅक आहेत.

ऑक्सिजनचे 2,725 बेड, 396 व्हेंटिलेटर्स

महापालिकेच्या विविध रूग्णालयांत एकूण 2 हजार 725 ऑक्सिजन बेड आहेत. एकूण 692 आयसीयु बेड आहेत. व्हेंटिलेटर्स 396 आहेत.

ऑक्सिजनविरहित बेड 2 हजार 725 आहेत. कोविड केअर सेंटरच्या 14 ठिकाणी तर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर 125 आहेत. जिजामाता, भोसरी व आकुर्डी, थेरगाव ही रुग्णालये कोविड रुग्णालय आहेत.

भोसरी रुग्णालयात परदेशातून आलेल्या कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तेथे 90 बेड व 12 आयसीयू बेड आहेत. जिजामाता रुग्णालयात कोरोनाबाधित बाल रुग्णांसाठी 100 बेड व 12 आयसीयू बेड आहेत. कोरोनाच्या सर्वसामान्य रुग्णांसाठी थेरगाव रुग्णालयात 200 बेड व 28 आयसीयू बेड आणि आकुर्डी रुग्णालयात 132 बेड व 14 आयसीयू बेडची व्यवस्था आहे. रुग्ण संख्या वाढल्यास ऑटो क्लस्टर व नेहरूनगरचे जम्बो रुग्णालय टप्पाटप्याने सुरू केले जाईल. वायसीएम रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासोबतच, आवश्यक औषधाचा साठा व मनुष्यबळ तयार ठेवले आहे. नव्या रुग्णालयांचे स्ट्रॅक्चरल व फायर ऑडीट केले आहे. सर्व रुग्णालये ऑक्सिजन पुरवठ्याने सज्ज आहेत.
-राजेश पाटील, आयुक्त, महापालिका

SCROLL FOR NEXT