मुंबई, पुढारी वृत्तसेवा
भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे चार बालकांचा दुदैवी मृत्यू झाला. नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षात शॉक लागल्याने ही घटना घडली. यामध्ये एक बालक अत्यवस्थ आहे. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी गुरुवारी दुपारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर निदर्शने केली.
एनआयसीयूमध्ये जीवघेणे इन्फेक्शन होतेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल सत्ताधाऱ्यांना बाल मृत्यूने शोकाकुल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरेसुतक नाही. तसेच पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याची घणाघाती टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
हॉस्पिटल व्यवस्थापन खाजगी संस्थेकडून काढून घेऊन, खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी. नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर आणि खाजगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी भाजपने केली आहे.
हेही वाचा