पुणे

पुणे : ससूनमधील 800 परिचारिका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न रुग्णालयांतील परिचारिका विविध मागण्यांसाठी शनिवारी बेमुदत संपावर गेल्या आहेत. ससून शासकीय रुग्णालयातील जवळपास 800 परिचारिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे. तातडीची सेवा वगळता इतर परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे औंध हॉस्पिटलमधील 19 परिचारिका आणि विद्यार्थ्यांना कामावर बोलावण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यस्तरीय दोन दिवस (दि.26 व 27 मे) कामबंद आंदोलन पुकारले होते. परंतु, राज्य शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शनिवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील 90 टक्के परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. तातडीचे रुग्ण वगळता इतर रुग्णांची सेवा थांबविल्याने रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील 100 टक्के पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती बाह्यस्रोताद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी, केंद्र सरकारप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा, गणवेश भत्ता, पदनाम बदल, परिचारिका संवर्गातील पदवी प्राप्त कर्मचार्‍यांना केंद्र सरकारप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी, परिचारिका संवर्गातील कर्मचार्‍यासाठी निवासस्थान अपुरे आणि खूप जुने आहेत. त्यांना नवीन निवासस्थान बांधून द्यावेत, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाळणाघर उपलब्ध करून द्यावेत.

रुग्णालयात सध्या एकूण परिचारिकांपैकी 60 टक्के परिचारिका संपावर असून, उरलेल्या 40 टक्के सेवेत आहेत. तर, तातडीच्या शस्त्रक्रिया सध्या करण्यात येत आहेत. तर, नियोजित शस्त्रक्रिया परिचारिकेच्या अभावी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने एकूण परिचारिकांपैकी 90 टक्के परिचारिका या संपावर गेल्या असून, केवळ दहा टक्केच कामावर हजर झाल्याचा दावा केला आहे.

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी डॉक्टर, नर्सिंग स्टुडंट, परिचारिका ट्यूयर, अध्यापक, इतर डॉक्टर यांना अतिरिक्त ड्यूटी लावण्यात आली आहे. तसेच औंध हॉस्पिटलमधून 19 परिचारिका रविवारपासून ससून रुग्णालयात येणार आहेत.

                                            – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT