उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

गणेश सोनवणे

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील देवगाव – कानळद रस्त्यालगत देवगाव शिवारात गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक (54, रा. मंजूर, हंडेवाडी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी राजेंद्र बोचरे यांना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास देवगाव शिवारात दुचाकी (एमएच 15 ईसी 4436) आढळली व नजीकच मृतदेह आढळला. त्यांनी लासलगाव पोलिस ठाण्याला खबर दिली असता, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, गुन्हे शोधचे उपअधीक्षक हेमंत पाटील, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, लासलगावचे सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

चौकशीत मृत व्यक्ती अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे पाय बांधलेल्या अवस्थेत होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे, उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT