Russia Ukraine War : पुतीन यांच्या मुलींवर अमेरिकेकडून बंदी | पुढारी

Russia Ukraine War : पुतीन यांच्या मुलींवर अमेरिकेकडून बंदी

वॉशिंग्टन/मॉस्को ; वृत्तसंस्था : अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दोन्ही मुलींवर बंदी (Russia Ukraine War) लादली आहे. पुतीन यांनी मुलींच्या नावावर स्वतःची संपत्ती कुटुंबातील सदस्यांच्या नावावर लपवून ठेवली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने पुतीन यांच्या खासगी संपत्तीवर परिणाम होईल, असे व्हाईट हाऊसमधील एका अधिकार्‍याने म्हटले आहे.

पुतीन यांची थोरली मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोव्हा सध्या क्रेमिलन म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात काम करत आहे. 36 वर्षीय मारिया अधिकृतरित्या रशियाच्या आरोग्य मंत्रालयात नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर ऑफर एंडोक्रोनोलॉजी विभागातील प्रमुख संशोधक आहे. गतवर्षी मारिया यांचा घटस्फोट झाला होता. (Russia Ukraine War)

रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीवरूनही त्या चर्चेत होत्या. मॉस्को विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. रशियाच्या जेनेटिक रिसर्च प्रोग्रॅमचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. आपल्या कामाचा अहवाल मारिया थेट पुतीन यांना देतात.

पुतीन यांची धाकटी मुलगी कतेरिना तिखोनोव्हा क्रेमलिनमध्येच कार्यरत आहे. संरक्षण विभागातील तंत्रज्ञानाशी संबंधित काम ती पाहते. 29 वर्षीय कतेरिना 15 हजार कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. तिचा पती क्रिल शामलोव्ही रशियन बँकेत आहे. कतेरिना सुरवातीच्या काळात पुतीन यांची भाषणे लिहून देत असे.

Back to top button