सोलापूर : लाच घेताना पाटबंधारे विभागाचा कर्मचारी जाळ्यात | पुढारी

सोलापूर : लाच घेताना पाटबंधारे विभागाचा कर्मचारी जाळ्यात

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शेत जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखल्याची एकाने मागणी केली होती. हा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. ही लाचेची रक्कम स्विकारताना पाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले.

सुखदेव मारुती सुतार, वय ५३ वर्षे पद मोजणीदार, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा, जवळगाव ता. बार्शी असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांची मौजे सासुरे तालुका बार्शी येथील शेत जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखल्याची एकाने मागणी केली होती. हा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

सदरची लाच रक्कम सुतार यांनी स्वतः स्विकारली म्हणून त्यांच्याविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस अमलदार घुगे, अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Back to top button