उत्तर महाराष्ट्र

अखेर पोलीस बंदोबस्तात नंदुरबार आगारातून धावली पहिली बस

backup backup

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार बसस्थानकातून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पहिली बस धुळ्याकडे रवाना झाली. कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत अन्य संपकरी कर्मचाऱ्यांनी  संताप व्यक्त केला. गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप अद्याप संपण्याचे नाव घेत नसल्याने सामान्य जनता वैतागली आहे.

नंदुरबार आगारात 547 कर्मचारी आहेत. त्यापैकी 26 कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याचा दावा आगार व्यवस्थापक मनोज पवार यांनी केला. दरम्यान नंदुरबार आगारातील एक चालक किरण पवार यांनी कामावर रुजू होण्याची उघड भूमिका घेत बस घेऊन जाण्याची तयारी केली. यावरून आगारात वादंग उभे राहिले. संप करणाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे भासवण्यासाठी हा प्रकार घडवला जात असून कोणीही याला गांभीर्याने घेऊ नये, आम्ही सर्व कर्मचारी एकजूट असून आमचा संपत चालूच राहील; अशी प्रतिक्रिया या प्रसंगी संपकरी संघटनेच्यावतीने देण्यात आली.

चालक किरण पवार यांनी सांगितले की,  मागील 28 दिवस झाले ते रजेवर होते. उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यामुळे संपात सहभागी होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नंदुरबार आगार मधून किरण पवार हे चार प्रवासी बसवून नंदुरबार-धुळे ही बस घेऊन निघाले. त्यावेळी संपकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी बसस्थानकातील स्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसच्या पुढेमागे पोलिस वाहन देण्यात आले. नंदुरबार शहराच्या बाहेरील हद्दीपर्यंत सुरक्षित सोडण्यात आले. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही पहिली बस रवाना झाली.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT