Petrol Price : राजधानीत व्हॅट कपातीनंतर पेट्रोल ९५.४१ रुपयांवर | पुढारी

Petrol Price : राजधानीत व्हॅट कपातीनंतर पेट्रोल ९५.४१ रुपयांवर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशभरात गेल्या महिन्याभरापासून पेट्रोलचे दर ( Petrol Price ) स्थिर आहेत. दिल्ली सरकारने व्हॅट कमी केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर घटले आहेत. राजधानीत पेट्रोलचे दर १०० रूपयांहून कमी झाले आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रूपये प्रती लिटर प्रमाणे विक्री करण्यात आली. आप सरकारने पेट्रोल वरील व्हॅट ३० टक्क्यांनी घटवून १९.०४ टक्क्यांवर आणला आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

३ नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर इंधनाच्या दरात बदल झाला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर ( Petrol Price ) उच्चांकी पातळीवर पोहचल्यानंतर केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंजाब आणि छत्तीसगढ सरकारकडून पेट्रोल वरील व्हॅटवर कपात केल्यानंतर भाजपची सरकार नसलेल्या दिल्ली सरकारने व्हॅट कपात केली आहे. इतर राज्यांनी पेट्रोल वरील व्हॅट घटवला आहे. पंरतु, महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कपातीसंबंधी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीचा अतिरिक्त ओझे पडत आहे. राज्यात सर्वाधिक महागडे पेट्रोल मिळत असल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

मुंबईत पेट्रोलचे दर ( Petrol Price ) १०८.९८ रूपये आहे. महानगरांमध्ये सर्वाधिक महागडे पेट्रोल देशाच्या आर्थिक राजधानीत मिळत आहे. कोलकाता मध्ये पेट्रोलचे दर १०४.६७ रूपये प्रती लीटर आणि चेन्नई मध्ये १०१.४० रूपये प्रती लीटर पर्यंत पोहचले आहेत.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button