नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने त्रयस्थ संस्थेकडून राबविलेल्या तलाठी भरती प्रक्रियेला उमेदवारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यासाठी ६३६ पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ६७ हजार ९३३ जणांनी ही परीक्षा दिली. त्यामुळे एका जागेकरिता तब्बल १०७ उमेदवारांमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ८० हजार ५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते. (Talathi Exam )
संबधित बातम्या :
राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सध्या वेगवेगळ्या पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येते आहे. महसूल विभागातील तलाठी पदे भरण्यासाठीही परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ६३६ पदे भरण्याकरिता गेल्या सुमारे महिनाभरापासून परीक्षा घेण्यात येत होती. या परीक्षेकरिता ८० हजार ५९९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६७ हजार ९३३ जण परीक्षेला सामोरे गेले, तर १२ हजार ६६६ उमेदवार या परीक्षेला गैरहजर राहिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली आहे. त्यामुळे एका जागेसाठी तब्बल १०७ उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावरच उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. (Talathi Exam )
तलाठी परीक्षेसाठी प्राप्त एकूण अर्ज – ८०,५९९
परीक्षा देणारे उमेदवार – ६७,९३३
परीक्षेला अनुपस्थित उमेदवार – १२,६६६
हेही वाचा :