नाशिक

Navratri 2023 : सप्तशृंगी गडावरील नवरात्रौत्सवास प्रारंभ; पहिल्या दिवशी ३० हजार भाविकांची उपस्थिती

मोहन कारंडे

सप्तशुंगगड; तुषार बर्डे : साडेतीन शक्तीपीठांपैकी स्वंयभू आद्यशक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील (Saptshringi Fort) नवरात्रोत्सवास (Navratri 2023)आजपासून प्रारंभ झाला. आज पहाटेपासूनच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून भक्तांनी सप्तशृंगी गडावरती दर्शनासाठी गर्दी केली आहे. पहिल्या दिवशीचे नवरूप बघण्यासाठी भक्तांनी गडावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

संबंधित बातम्या : 

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त (Navratri 2023) आज सप्तशृंगी मातेची महापूजा नाशिक जिल्ह्याचे प्रदान जिल्हा सत्र न्यायाधीश एच.डी. जलामनी, नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अकरा वाजता शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ११११ घटांची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिरात जाण्यासाठी ५२० पायऱ्या चढून गेल्यानंतर बारा ठिकाणी बारा लावण्यात आलेले आहेत. मंदिरामध्ये पायऱ्यांवरती ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच प्रवेशद्वाराजवळ नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. देवी संस्थानतर्फे भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गावाच्या दीड किलोमीटर अंतरावर मेळा बस स्थानकाची स्थापना करण्यात आलेली आहे. दीड किलोमीटर अंतरावरून भक्तांना गावामध्ये प्रवेश दिला जात आहे. सप्तशृंगी गडावर भक्तांना सुलभ दर्शन होण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासह कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT