नाशिक

Nashik Ganesh Visarjan : नाशिककरांनी दिला सात दिवसांच्या गणरायाला निरोप

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व परिसरात सोमवारी (दि. २५) सात दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यावेळी भक्तांनी गणेशाला पुढील वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले. (Nashik Ganesh Visarjan)

गेल्या सात दिवसांपासून भक्तांच्या घरी पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. दुपारी चारनंतर रामकुंड परिसर, गोदाघाट, गांधी तलावासह घारपुरे घाट, तपोवन, साेमेश्वर, नवश्या गणपती मंदिर परिसर आदी भागांत मोठ्या संख्येने भक्त विसर्जनासाठी मूर्ती घेऊन येत होते. यावेळी भक्तांनी केलेल्या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया; पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, सात दिवसांपासून घरात विराजमान असलेल्या श्री गणरायामुळे आनंद, चैतन्य व मांगल्याचे वातावरण होते. (Nashik Ganesh Visarjan)

संबधित बातम्या :

दरम्यान, यंदाच्या वर्षी नाशिककरांनी गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत गणेशमूर्ती दान केल्या. महापालिकेच्या शहरातील कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तसेच प्रमुख विसर्जनस्थळी मनपा व अन्य धार्मिक, सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या स्टॉलवर मूर्तीचे दान करून शहरवासीयांनी जगापुढे उत्तम उदाहरण निर्माण केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT