दरड कोसळल्यामुळे सापडला 2500 वर्षांपूर्वीचा दागिना

दरड कोसळल्यामुळे सापडला 2500 वर्षांपूर्वीचा दागिना

माद्रिद : उत्तर स्पेनमध्ये दरड कोसळल्यामुळे अपघातानेच तब्बल 2500 वर्षांपूर्वीचा सोन्याचा नेकलेस सापडला. अतिशय सुंदररीत्या सजवलेला हा हार जमिनीत पुरून ठेवला होता व दरड कोसळल्याने तो जमिनीबाहेर आला.

सेर्जियो नार्सियांडी या पाणीपुरवठा विभागात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला हा नेकलेस आढळून आला. तो डोंगराळ भागातील 'अस्टुरिया' या समुदायातील लोकांच्या पेनामेल्लेरा बाजा या शहरातील पालिकेत काम करतो. अशा प्रकारच्या इंग्रजी 'सी' आकाराच्या नेकलेसपैकी हा सुरुवातीच्या काळातील नेकलेस आहे. या परिसरात अलीकडच्या काळात वणवे लागले होते. त्याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

एका ठिकाणी अशीच दरड कोसळून माती जवळच्या झर्‍याच्या दिशेने सरकली. त्यावेळी हा नेकलेस जमिनीतून वर आलेला आढळला. त्याची माहिती मिळताच कँटाब्रिया युनिव्हर्सिटीतील पाब्लो एरियास नावाच्या पुरातत्त्व संशोधकांने वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन करून हा नेकलेस बाहेर काढला. तो इसवी सन पूर्व 500 या काळातील असल्याचे निष्पन्न झाले. त्या काळातील सेल्टिक लोकांच्या संपन्न घराण्यांमधील लोक असे नेकलेस वापरत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news