पृथ्वीजवळून गेला विमानाइतक्या आकाराचा लघुग्रह

पृथ्वीजवळून गेला विमानाइतक्या आकाराचा लघुग्रह
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने म्हटले आहे की पृथ्वीजवळून विमानाइतक्या मोठ्या आकाराचा एक लघुग्रह नुकताच गेला. या लघुग्रहाचे नाव आहे '2023 आरक्यू6'. 'नासा'च्या सेंटर फॉर नियर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हा लघुग्रह जणू काही गुपचूपपणेच पृथ्वीच्या जवळून गेला! त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ 6.4 दशलक्ष किलोमीटर इतके होते.

हे अंतर अधिक वाटू शकते, पण खगोलीय अंतराचा विचार करता ते कमी आहे. 'नासा'ने म्हटले आहे की या लघुग्रहाचा वेग ताशी 33,912 किलोमीटर होता. विशेष म्हणजे या लघुग्रहाला 'नासा'ने धोकादायक खगोलांच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की हा लघुग्रह भविष्यात पुन्हा एकदा पृथ्वीजवळून जाऊ शकतो. अर्थात त्याची पृथ्वीला धडक होण्याची शक्यता नगण्यच आहे. या लघुग्रहाशिवाय '2023 एसजे' नावाचा एक लघुग्रह 21 सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळून गेला.

या लघुग्रहाची रुंदी 52 फूट ते 118 फूट इतकी आहे. '2023 आरक्यू 6' हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ असलेल्या 'अपोलो' समूहाशी संबंधित आहे. या समूहाचे नाव विशालकाय '1862 अपोलो' लघुग्रहावरून ठेवण्यात आले आहे. त्याचा शोध 1930 च्या दशकात जर्मन खगोलशास्त्रज्ञ केरल रेनमुथ यांनी घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news