Pune News : कात्रज कुल्फी, मस्तानी लवकरच बाजारात; टेट्रा पॅकमधील दूध मलई, मँगो, ड्रायफ्रुट्स कुल्फीही

Pune News : कात्रज कुल्फी, मस्तानी लवकरच बाजारात; टेट्रा पॅकमधील दूध मलई, मँगो, ड्रायफ्रुट्स कुल्फीही
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज संघाने कात्रज मलई कुल्फी, मँगो कुल्फी, ड्रायफ—ुट्स कुल्फी ही तीन फ्लेवर्समध्ये आणली असून, कात्रज मस्तानी व कात्रज टेट्रा पॅक दूध बाजारपेठेत आणत असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली. ग्राहकांसाठी ही उत्पादने लवकरच बाजारपेठेत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
कात्रज संघाकडून बाजारात येणार्‍या नवीन उत्पादनांचे लाँचिंग रविवारी (दि. 24) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष पासलकर यांच्यासह उपाध्यक्ष भाऊ देवाडे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब नेवाळे, केशरताई पवार, दिलीप थोपटे तसेच कालिदास गोपाळघरे, लता गोपाळे, निखिल तांबे, स्वप्निल ढमढेरे, चंद्रकांत भिंगारे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्या हस्ते करण्यात आले.
मकात्रजफची 32 उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संघाची 382 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षात गायीच्या दुधाचा सरासरी खरेदी दर प्रतिलिटरला 35 रुपये 6 पैसे, तर म्हशीच्या दुधाचा दर लिटरला 49 रुपये 57 पैसे राहिला. हा दर मागील वर्षी 2021-22 पेक्षा लिटरला 9 रुपयांनी जास्त आहे.
तुलनेने दूध विक्रीचे दर न वाढल्यामुळे खरेदी-विक्रीमधील फरक कमी झाला आहे. संघाला गतवर्षात 51 लाख रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे.  संघाने काही आधुनिक मशिनरी घेतल्या असून, त्यामध्ये श्रीखंड, आम—खंड, दही, ताक, लस्सी, पनीर, मिठाई व कुल्फी पॅकिंगचा समावेश असल्याची माहिती पासलकर यांनी दिली.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news