नाशिक

नाशिक क्राईम : सराईत गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लुटमार, मारहाण करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दिलीप विष्णू गायकवाड (२५, रा. सिद्धार्थनगर, कॉलेजरोड) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे.

संबधित बातमी :

दिलीप गायकवाडविरोधात मारहाण, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर याआधीही वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यास १७ मे २०२२ रोजी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र तरीही त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न होता त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरु होते. याची दखल घेत पोलिस आयुक्त शिंदे यांनी शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने गायकवाड यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

चालू वर्षांत 11 जणांवर कारवाई

शहरात गुन्हे करीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार २०२१ मध्ये ९, २०२२ मध्ये दोन तर चालू वर्षात ११ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT