उत्तर महाराष्ट्र

नाशिक : राधा मदनगोपाल मंदिरात चंदनयात्रेला प्रारंभ

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : द्वारका येथील श्री श्री राधा मदनगोपाल मंदिर (इस्कॉन) येथे मंगळवारपासून (दि.3) चंदनयात्रेला प्रारंभ झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेपासून पुढील 21 दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावतात. अक्षय तृतीयेपासून 21 दिवस चालणार्‍या या उत्सवात रोज भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करताना पुजारी विग्रहांवर चंदनाचे लेपण करतात. त्यासाठी सर्व भक्त रोज सकाळी चंदन उगाळून ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करतील. या सेवेसाठी सर्व वयोगटातील भक्त उत्साहाने सहभागी होतात. हा उत्सव वृंदावन व जगन्नाथपुरी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबतच जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरांत हा उत्सव साजरा केला जातो. नाशिककरांनी उत्सवात सहभागी होऊन विशेष दर्शनासाठी मंदिराला भेट द्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT