उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्र देशातील एकमेव भारनियमनमुक्त राज्य : नितीन राऊत

मोहन कारंडे

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा : कोळशाची वाहतूक नियोजन करण्यात केंद्राचा गोंधळ उडालेला दिसतो त्यामुळे भारतात महाराष्ट्र वगळता इतर राज्यात भारनियमन केले जात आहे. केंद्राच्या तुलनेत महाराष्ट्राचे नियोजन उत्तम आहे. महाराष्ट्र हे देशातील एकमेव भारनियमन मुक्त राज्य असल्याचा दावा, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नाशिक दौऱ्या दरम्यान केला.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी (दि.१२) एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्या राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. मागील बावीस दिवसांत भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न राहील. राज्याने कोळशाचे सूक्ष्म नियोजन केले असुन कोळशाची कमतरता आता भासू देणार नाही. महानिर्मीतीची वीज निर्मिती देखील प्रचंड वाढली आहे. मागील २२ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे लोडशेडींग नाही. यापुढेही लोडशेडींग होणार नाही याची काळजी घेत आहोत. शासनाचे लघु व दिर्घकालीन नियोजन असुन ऑक्टोबर पर्यंत नियोजन आहे. तसेच पावसाळ्यासाठी स्वतंत्र नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची लोडशेडींग आम्ही होऊ देणार नाही. देशातील स्थिती मात्र वेगळी आहे. देशात सध्या केंद्र सरकारचे नियोजन काहीच दिसत नाही. केंद्र सरकारने कोळशाचे नियोजन अद्याप पुर्णपणे व्यवस्थित केलेले नाही. रेल्वे प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सुरु झाल्या असल्या तरीही देशात कोळशाचा पुरवठा जसा हवा तसा होताना दिसत नसल्याची टिका राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. यावेळी आमदार सरोज अहिरे, राजाराम धनवटे, गणेश गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

SCROLL FOR NEXT