‘जागर कदम वंशाचा’ पुस्तकाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन | पुढारी

'जागर कदम वंशाचा' पुस्तकाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

खेड; पुढारी वृत्तसेवा : ‘जागर कदम वंशाचा’ पुस्तकाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते गुरुवारी (दि १२) खेड तालुक्यातील जामगे येथे प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखन व ऐतिहासिक माहितीचे संकलन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे.

आता निपाणीत ‘भोंगा’ सुरु; मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी

या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते खा. गजानन कीर्तिकर, शेकापचे जयंत पाटील, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, इतिहास संशोधन मंडळाचे डॉ. सतीश कदम आदी उपस्थित होते. यावेळी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे भव्य आयोजन जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवस्थानच्या शिवसृष्टीच्या परिसरात करण्यात आले होते. यानिमित्त राज्यभरातून कदम वंशीय विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

हेही वाचलंत का ?

Back to top button