प्रवीण दरेकर 
उत्तर महाराष्ट्र

किरीट सोमय्यांवरील हल्ला शिवसैनिकांचा कट : दरेकर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या ज्या पद्धतीने पुराव्यासहीत भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत, त्यामुळे शिवसेना उघडी पडली आहे. यामुळे सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी पूर्वनियोजित कट करून हल्ला करण्यात आला, असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मालेगाव दौर्‍यावर आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाशिक येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, अनिल परब यांनी हे होणारच, असे म्हटले आहे. यावरून हा हल्ला पूर्वनियोजित होता व हल्लेखोरांना आदेश कोण देते, हे जगजाहीर आहे, असा आरोप त्यांनी केला. सोमय्या यांनी झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था असूनही 100 ते 150 शिवसैनिकांनी कट करून हा हल्ला केला आहे, ही लज्जास्पद आहे. या घटनेवरून राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी रसातळाला गेली आहे, हे दिसून आल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, देशात लोकशाही आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. तसेच सर्व हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपने उद्या राज्यभर आंदोलन सुरू केले, तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची नुकतीच भेट झाली, याबाबत ही भेट केवळ विकासकामांसाठीच होती, असा दावा त्यांनी केला. नीतेश राणे यांच्या अटकेबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडला आहे. तसेच महाराष्ट्रात जणू नितेश राणे हाच सर्वांत मोठा प्रश्न असल्याच्या आविर्भावात सरकार काम करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. एसटीच्या संपामुळे राज्यातील सार्वजनिक व्यवस्था विस्कळीत झाली असून, परिवहनमंत्री हा प्रश्न सोडवू शकले नसल्याची टीका त्यांनी केली. आगामी महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याबाबत ते म्हणाले, मनसे अस्पृश्य नाही. मात्र, अद्याप युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT