नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन | पुढारी

नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीच्या के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांचे रविवारी (दि.६) रात्री साडे दहाच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० होते. त्यांचा अंत्यविधी सोमवारी (दि. ७) पंचवटीतील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल. अंत्यदर्शन दुपारी १२ पासून ३ वाजेपर्यंत होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button