उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हिरावाडीत दोघांवर प्राणघातक हल्ला

अनुराधा कोरवी

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : मागील भांडणाची कुरापत काढून पंचवटी येथील हिरावाडीतील त्रिमूर्तीनगर येथील दोघांवर सहा – सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी ( दि. २३) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दोघांपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बाळा मंडलिक (रा. अमृतधाम, पंचवटी) आणि गिप्पी उर्फ व्यंकटेश शर्मा (रा. साईनगर, अमृतधाम, पंचवटी ) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेतील गिप्पी उर्फ व्यंकटेश शर्मा याची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती नगरमधील सचिन जोशी या संशयितासह सहा- सात जणांच्या टोळक्याने बाळा मंडलिक आणि गप्पी शर्माला गाठून मागील भांडणाची कुरापत काढत वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद वाढत गेल्याने टोळक्यातील एकाने दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर जखमीना तेथून सोडून संशयितांनी तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT