MSRTC Smart Card Pudhari
अहिल्यानगर

ST Smart Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आता स्मार्टकार्ड बंधनकारक!

१ ऑक्टोबरपासून कार्डमध्ये प्रवासाच्या भाड्याइतकी शिल्लक आवश्यक; अन्यथा ज्येष्ठ नागरिक, महिलांना पूर्ण भाडे

पुढारी वृत्तसेवा

नगर: एसटी महामंडळाने सवलतीचा प्रवास करणार्‍यांसाठी १ ऑक्‍टोबरपासून स्‍मार्टकार्ड (एनसीएमसी) बंधनकारक केले आहे. जेवढा प्रवास करावयाचा त्‍या तिकीटदराइतके पैसे या कार्डमध्‍ये शिल्‍लक असणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा सवलतीचा लाभ मिळणार नाही. एसटी महामंडळाच्‍या या निर्णयाचा फटका गोरगरिब जनतेला बसणार आहे.

एसटी महामंडळाकडून अमृत ज्‍येष्‍ठ नागरिकांना शंभर टक्‍के तर ज्‍येष्‍ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ५० टक्‍के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. यासाठी आधार कार्ड दाखविणे बंधनकारक होते. मात्र, एसटी महामंडळाने आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) हे आधुनिक स्‍मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. महामंडळाकडून १ सप्‍टेंबरपासूनच स्‍मार्टकार्ड बंधनकारक केले जाणार होते.

मात्र, तांत्रिक अडचणी आणि लाखो प्रवाशांची नोंदणी अपूर्ण राहिल्याने महामंडळाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ मिळूनही काही वाहकांनी स्‍मार्ट कार्ड नसल्‍यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिक व महिला प्रवाशांकडून पूर्ण प्रवास भाडेदेखील वसूल केल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत.

आता १ ऑक्‍टोंबरपासून स्‍मार्टकार्ड नसणार्‍या ज्‍येष्‍ठ नागरिक व महिलांकडून पूर्ण प्रवास भाडे आकारले जाणार आहे. स्‍मार्टकार्ड नोंदणी केल्‍यानंतर एक महिन्‍यात ते उपलब्‍ध होते. मात्र, नोंदणी केली. परंतु प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही, अशा प्रवाशांना ३० दिवसांपर्यंत नोंदणी पावतीवरील क्यूआर कोड स्कॅन करून सवलतीचे तिकीट दिले जाणार आहे.

प्रवासाचा विनाअडथळा लाभ घेण्यासाठी या स्‍मार्टकार्डमध्‍ये कमीत कमी शिल्‍लक असणे आवश्‍यक आहे. जेवढ्या प्रवास करावयाचा तेवढी रक्‍कम या स्‍मार्टकार्डमध्‍ये शिल्‍लक असणे बंधनकारक आहे. अन्‍यथा सवलतीचा लाभ घेता येणार नसल्‍याचे महामंडळाने नमूद केले.

...तर वाहक मदत करतील

स्‍मार्टकार्डमध्‍ये शिल्‍लक नसेल आणि जवळ स्मार्टफोन असल्‍यास बसमध्येच कार्डच्या मागील बाजूचा QR कोड UPI द्वारे स्कॅन करून ऑनलाईन रिचार्ज केल्यावर तत्‍काळ वाहकाला स्‍मार्टकार्ड त्यांच्या मशीनवर ठेवून सिंक बॅलन्‍स 'करण्यास सांगितल्‍यास रिचार्ज केलेले पैसे कार्डमध्ये जमा होऊन सवलतीचे तिकीट काढणे सुलभ होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT