Pathardi Police Security: मोहटादेवी नवरात्रोत्सवासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त; एसपी सुदर्शन यांचा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

पाथर्डी पोलिस ठाण्यालाही भेट; लवकरच नवीन पोलिस निरीक्षक आणि चारचाकी वाहन देण्याची ग्वाही
Police Mock Drill
Police Mock DrillPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी पाथर्डी पोलिस ठाणे आणि श्रीक्षेत्र मोहटादेवी येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मोहटादेवी नवरात्रोत्सवासाठी आवश्यक तो वाढीव पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Police Mock Drill
Pathardi Illegal Liquor Sale: पाथर्डीत अवैध दारूविक्रीवर एलसीबीचा ‘पंच’; पाच ठिकाणी छापे, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी श्रीक्षेत्र मोहटादेवी येथे देवीची आरती व पूजा करून दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने देवस्थान समितीकडून करण्यात आलेली तयारी, तसेच पोलिस प्रशासनाची जबाबदारी याबाबत त्यांनी देवस्थान समितीचे जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी खाडे यांनी नवरात्रोत्सवासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर सुदर्शन यांनी आवश्यक तो बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल. उत्सव शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांकडून योग्य नियोजन केले जाईल, असे सांगितले.

Police Mock Drill
Bhingar Cantonment FSI: भिंगारकरांना मोठा दिलासा; कॅन्टोन्मेंट हद्दीत आता दोन एफएसआयला मंजुरी

यानंतर पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट देऊन गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मागील आठवड्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या लाचप्रकरणानंतर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांची बदली झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांची ही पाथर्डी पोलिस ठाण्याला भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Police Mock Drill
Pathardi Child Marriage: पाथर्डीत बालविवाहाचे धक्कादायक वास्तव; चार अल्पवयीन मुली गर्भवती

आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सुदर्शन यांनी दिल्या.

Police Mock Drill
Ahilyanagar District Bank Election: थोरात-विखे एकत्र; जिल्हा बँकेसाठी ऐतिहासिक समझोता

दरम्यान, पत्रकारांनी नवीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीबाबत विचारले असता, लवकरच पाथर्डी पोलिस ठाण्यासाठी नवीन पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाथर्डी पोलिस ठाण्याची हद्द मोठी असून गस्त व अन्य कामांसाठी चारचाकी वाहनाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, लवकरच पाथर्डी पोलिस ठाण्याला नवीन वाहन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सुदर्शन यांनी सांगितले.यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पाथर्डीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे हे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news