Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडीला सभासदांचा ‘ब्रेक’?

पहिल्याच दिवशी ३६१ उमेदवारी अर्जांची विक्री; राहुल जगताप मैदानात, राम शिंदेही दोन दिवसांत अर्ज भरणार
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: एकीकडे प्रस्थापित नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असला, तरी दुसरीकडे सामान्य सभासदांचा ‘मूड’ वेगळाच दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. २८) 361 जणांनी अर्ज नेले. माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

Ahilyanagar District Bank
Pathardi Police Security: मोहटादेवी नवरात्रोत्सवासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त; एसपी सुदर्शन यांचा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनात सहायक निबंधक देविदास घोडेचोर तसेच रावसाहेब खेडकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशीच जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे सभा सुरू होण्यापूर्वीच सभासदांनी अर्ज नेण्यासाठी गर्दी केली. प्रति अर्ज 100 रुपयांप्रमाणे 361 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यात सीताराम गायकर वगळता उर्वरित 360 अर्ज सामान्य सभासदांनी नेल्याचे समजते. त्यामुळे बिनविरोध निवडीबाबत यातून सभासदांच्या प्रतिक्रिया दिसत असल्याचे मानले जात आहे.

Ahilyanagar District Bank
Pathardi Illegal Liquor Sale: पाथर्डीत अवैध दारूविक्रीवर एलसीबीचा ‘पंच’; पाच ठिकाणी छापे, २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

राहुल जगतापाचं ठरलं!

संगमनेर येथील सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण श्रीगोंद्यातील आमदार विक्रम पाचपुते, प्रताप पाचपुते व राजेंद्र नागवडे यांना होते. मात्र माजी आमदार राहुल जगताप यांना टाळल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. जगताप यांनीही बँकेसाठी पहिला अर्ज दाखल करून एकप्रकारे श्रीगोंद्यातून नागवडे-पाचपुतेंना आव्हान दिल्याचे बोलले जाते.

दक्षिणेतील मतदार अज्ञातस्थळी?

जिल्हा बँकेची निवडणूक होणारच, हे गृहीत धरून एका बड्या नेत्याने आपले ठराव असलेले मतदार दहा वाहनांमधून अज्ञातस्थळी रवाना केले आहेत. हे सर्व मतदार दक्षिणेतील एका तालुक्यातील असून, मंगळवारी (दि. २९) शेजारील तालुक्यातील मतदारही ‘उचलले जाणार’ असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Ahilyanagar District Bank
Bhingar Cantonment FSI: भिंगारकरांना मोठा दिलासा; कॅन्टोन्मेंट हद्दीत आता दोन एफएसआयला मंजुरी

शिवसेनाही दुखावली; अहिल्यानगरला आज बैठक

संगमनेरातील सर्वपक्षीय बैठकीला शिवेसेनेचे आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांना डावलल्याची चर्चा झाली. झावरे यांनी हा विषय थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवला. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे मंगळवारी (दि. २९) बैठक बोलावल्याचे झावरे यांनी ‘पुढारी’ला सांगितले.

‘साहेब’ म्हणून आपल्याला बोलावलं नाही’!

बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर सोमवारच्या सभेसाठी आले होते. बँकेत अंबादास पिसाळ त्यांना भेटले. त्या वेळी ‘संगमनेरच्या बैठकीला न बोलावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र पिसाळ यांनी त्यांना समजावले.. म्हणाले, ‘‘साहेब, मी माहिती घेतली. ती बैठक फक्त सात जागांसाठी होती. आपले ठराव सोसायटी मतदारसंघातील आहेत. म्हणून आपल्याला बोलावलं नव्हतं..’’ हे ऐकताच गायकरांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. ‘मला वाटलं आपल्याला पण बाजूला टाकलं की काय...’ असे ते म्हणताच तिथे हशा पिकला.

Ahilyanagar District Bank
Pathardi Child Marriage: पाथर्डीत बालविवाहाचे धक्कादायक वास्तव; चार अल्पवयीन मुली गर्भवती

राम शिंदेे भरणार दोन दिवसांत अर्ज

‘संगमनेरातील बैठकीला उपस्थित नसलो तरी मी जिल्ह्यासोबत आहोत. मात्र बिनविरोधच्या आडून कोणी स्वतःचा अजेंडा चालवणार असेल, तर ते गैर आहे,’ असे सांगून दोन दिवसांत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी लक्ष घातले आहे. संगमनेरातील बैठकीत नेमके काय ठरले, हे मला माहीत नाही; मात्र ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. चर्चेनंतरच मला काही गोष्टी समजतील. सहकारात सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असते. माझ्याकडेही अनेक जण ॲप्रोच होत आहेत. मात्र बँक वाचली पाहिजे, जगली पाहिजे यासाठी प्रथा, परंपरेनुसार बिनविरोध निवडणुकीसाठी मी सकारात्मक आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी 361 उमेदवारी अर्ज नेल्याकडे लक्ष वेधल्यावर, ‘कदाचित ज्यांना निवडून येऊ असे वाटते, ते उमेदवारी अर्ज भरतीलही,’ अशा शब्दांत त्यांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news