Ajit Pawar Pudhari
अहिल्यानगर

Ajit Pawar Death Tribute: अजित पवार यांच्या निधनाने नगर जिल्हा शोकमय; अनेक तालुक्यांत कडकडीत बंद

पाथर्डी, जामखेड, करंजी, खर्डा, कोळगावसह दक्षिण भागात सर्वपक्षीय श्रद्धांजली

पुढारी वृत्तसेवा

नगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने नगर जिल्ह्यच्या दक्षिण भागातील जनात, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते हेलावले आहेत. स्व. पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकांना दुःख अनावर झाले. असा नेते पुन्हा होणे नाही, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त करीत आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अनेक शहरांसह गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे गुरुवारी पाथर्डी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक, नागरिक, तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठा, दुकाने, व्यापारी आस्थापने, हॉटेल्स व सेवा केंद्रे पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. पाथर्डी शहर हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने ग्रामीण भागातून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी, शासकीय कामकाज, उपचार व इतर कारणांसाठी शहरात येत असतात. मात्र, शहर बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमीची गजबज गुरुवारी शहरात दिसून आली नाही. परिणामी रस्ते ओस पडले असून नेहमी वर्दळीने गजबजणारे चौक, बाजारपेठा व मुख्य मार्गांवर दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खासगी वाहने, रिक्षा, एसटी बसची वर्दळ अत्यल्प होती. सार्वजनिक व खासगी वाहतुकीवर बंदचा मोठा परिणाम झाला. नागरिकांनी कोणतीही अनुचित घटना न घडवता शांततेत बंद पाळत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण शहरात शोकमय वातावरण पसरले होते. दरम्यान, सरकारी कार्यालये व बँकांचे कामकाज सुरू होते. मात्र, बंदच्या पार्श्वभूमीवर येथेही नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. कर्मचारी उपस्थित असले तरी कामकाजावर मर्यादित परिणाम झाला. शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची ये-जा पूर्णतः थांबली होती. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली होती. नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत हळहळ व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत पुकारलेल्या बंदला पूर्ण दिवसभर कडकडीतपणे पाळण्यात आला होता.

चांद्यात कडकडीत बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजतात चांदा ग्रामस्थांनी स्वयंपूर्ण कडकडीत बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. चांदा ग्रामस्थांच्या वतीने स्व. पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळपासूनच गावात शुकशुकाट जाणवत होता. सकाळी दहा वाजता माजी सभापती कारभारी जावळे, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, गणेश दहातोंडे, निवृत्ती भगत, संजय दहातोंडे, अमित रासने, झुंबर शेळके यांनी दादांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आतापर्यंत समाजहिसाठी केलेल्या त्यांच्या कर्तृत्वाचा दाखला देत. असा नेता होणे नाही, असा शब्दात आदरांजली वाहिली.

ढोरजळगावात पवारांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना ढोरजळगाव परिसराच्या वतीने गुरुवारी गाव व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवारी ढोरजळगाव येथील व्यापार पेठ पूर्णपणे बंद ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, ढोरजळगाव-शे, ढोरजळगाव-ने, गरडवाडी, मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने तुळजाभवानी मंदिरासमोर शोकसभा घेण्यात आली. यावेळी ढोरा नदीवरील बंधारा बांधण्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी मा. आ. चंद्रशेखर घुले यांना पत्र देऊन बंधाऱ्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आज हा परिसर सुजलम सुफलाम झाल्याची भावना अनेक वक्त्‌‍यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला व सहकाराची तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा प्रसंगी स्वतःच्या सरकारशी भांडणारा, कष्टकरी जनतेला ही आपलासा वाटणारा नेता, स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याचे सांगताना अनेकांना गहिवरून आले. अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा दादा आपका नाम रहेगा या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्व. अजित पवार यांना शुक्रवारी (दि. 30) सकाळी 10.30 वाजता जामखेड शहरातील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. निर्णयक्षम नेतृत्व, प्रशासनावर भक्कम पकड आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी अनेक वर्षे राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने राजकारणासह समाजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शोकसभेत स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, जामखेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अजित पवारप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.

करंजीत कडकडीत बंद

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता सर्वपक्षीय शोकसभा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी करंजी गावातील व्यवसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत व्यवहार बंद ठेवले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाला उजळा दिला. अनेकांनी पवार यांच्या राजकीय जीवनातील अनुभव व्यक्त केले. पाथर्डी-शेवगावकडे प्रवास करताना पवार यांचे करंजी बसस्थानक चौकात कार्यकर्ते स्वागत करीत असत. करंजी येथील जनावरांच्या छावणीला त्यांनी भेट दिली होती. या आठवणींना मान्यवरांनी जागवल्या. यावेळी उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती ॲड मिर्झा मणियार, सुरेश साखरे, माजी सरपंच सुनील साखरे, सरपंच रफिक शेख, शिक्षक नेते विजय अकोलकर, माजी पोलिस अधीक्षक माणिकराव अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, छानराज क्षेत्रे, अशोक अकोलकर,आबासाहेब अकोलकर, उपसरपंच बंटी अकोलकर,सुभाष अकोलकर, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर, रघुनाथ अकोलकर, सरपंच राजेंद्र पाठक, सरपंच सुनील टेमकर, महादेव आकोलकर, राजेंद्र क्षेत्रे, आसाराम अकोलकर, सतीश क्षेत्रे, बाबासाहेब गाडेकर, गजानन गायकवाड, जालिंदर वामन, सुभाष आकोलकर, बंडू अकोलकर, दीपक अकोलकर, दिलीप शिंदे, भाऊसाहेब अकोलकर,बाळासाहेब अकोलकर, मुरलीधर मोरे उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. जनतेसाठी झटणारा नेता, कार्यकर्त्यांचे बळ वाढवणारा, सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करणारा, सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले अर्थमंत्रीपदाची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेले. अजित पवार यांच्या आठवणींना कार्यकर्त्यांकडून यावेळी उजाळा देण्यात आला. या प्रसंगी चेअरमन पुरुषोत्तम आठरे, भाजपा मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, अरुण रायकर, कुशल भापसे, माजी सरपंच सुरेश चव्हाण, सरपंच गणेश पालवे, नंदकुमार लोखंडे, मनोज ससाणे, रामेश्वर फसले, रावसाहेब लोहकरे, बापूराव घोरपडे, बापू कुटे, पोपट लोमटे, जिजाबापू लोंढे, पोपट कराळे, सचिन पवार, केतन खुडे, संदीप लवांडे, अभिजित चौधरी, अण्णासाहेब शिंदे, बाबाजी पालवे, अनिल गिते, सुनील साखरे, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर, भाऊ आव्हाड, अप्पासाहेब वांढेकर, सतीश पालवे, प्रणील सावंत, गणेश शिदोरे, किरण गर्जे, भैय्या बोरुडे, प्रदीप टेमकर, बंडू पाठक, रवींद्र भापसे, अर्जुन बुधवंत, दादासाहेब चोथे, आमदार कर्डिले यांचे स्वीय सहाय्यक सोमनाथ वामन, अमोल धाडगे, अतुल वाबळे उपस्थित होते.

अजित पवार कायम स्मरणात राहतील: नवले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज कामाचा आवाका, दरारा, प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असणारा प्रेमरूपी धाक, सर्वसामान्य तव तळागाळातील कार्यकर्त्यांना दिलेला आधार, पाठबळ आणि स्पष्ट वक्ते पणा सर्वांच्या सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत माजी सभापती काशिनाथ नवले पाटील यांनी स्व. पवार यांन श्रद्धांजली अर्पण केली. पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांना भेंडा गावातील व्यवहार बंद ठेवून बसस्थानक चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी अजितदादांच्या कार्याची, विविध घटना, प्रसंग यांची आठवण करून दिली. त्यात जलमित्र सुखदेव फुलारी, अंबादास गोंडे, भय्या निकम, बापूसाहेब नजन, नामदेव शिंदे, कारभारी गरड, भाऊसाहेब फुलारी, सोपान महापूर, बाळासाहेब नवले, गणेश गव्हाणे, दत्तात्रय काळे, अशोक मिसाळ उपस्थित होते. सभेस शिवाजीराव तगाड, येडूभाऊ सोनवणे, डॉ. लहानू मिसाळ, सुनील दगडे, कमलेश नवले, दादा गजरे, गणेश महाराज चौधरी, कृष्णा विधाटे, बाळासाहेब गव्हाणे आदींसह नागरिक उपस्थित होते.

खरवंडी परिसरात पवारांना श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित अनंतराव पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे समजताच खरवंडी परिसरातील कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. गुरुवारी सकाळी खरवंडी कासार येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच सुनील खेडकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंडसहमंत्री गणेश जवरे, उपसरपंच सुनील ढाकणे, तुकाराम खेडकर, सोमनाथ दराडे, सुनील जवरे, भाऊसाहेब दराडे, कपिल खेडकर, विनोद घुले, तसेच भगवानगड पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुवारी खरवंडी कासार येथील मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे आणि अजित पवार यांचे सख्य असल्याने अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकार काळात श्री क्षेत्र भगवान गडाला भरीव निधीची तरतूद केल्याने भगवानगड परिसराच्या वतीने अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

खर्डा गाव बंद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने खर्डा ग्रामस्थ शोकसागरात बुडाले. व्यापारी, व्यावसायिक संघटना व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. खर्डा बसस्थानक परिसरात झालेल्या सर्वपक्षीय ा शोकसभेस माजी खासदार सदाशिव लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, महालिंग कोरे, वैभव जमकावळे, दीपक जावळे, रामहरी गोपाळघरे, भाजप नेते भास्कर गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, संतोष लष्करे, अभिमान गिते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणेश ढगे, ओंकार इंगळे, ज्ञानेश्वर थोरात, दिगंबर थोरात, अण्णा शिंदे, अंकुश उगले, सतीश शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. स्व. पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र कर्तृत्ववान नेत्याला मुकला असल्याची भावना माजी खासदार लोखंडे यांनी व्यक्त केली.

कोळगावमध्ये श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाल्याचे समजताच कोळगाव ग्रामस्थांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे समजताच कोळगाव येथील ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. भाजीपाला बाजारवगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड, माजी सरपंच हेमंत नलगे, सोसायटीचे चेअरमन विश्वास थोरात, माजी उपसरपंच नितीन नलगे, मधुकर लगड, संजय लगड, धोंडीबा लगड, विजय नलगे, विलास शितोळे, चिमणराव बाराहाते ,शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस, बापूसाहेब कर्डिले यांनी आपली मनोगते व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बबन शिंदे, प्रतिभा धस, शिवदत्त धस, राजेंद्र दळवी, गोरख घोंडगे, धनंजय लगड, विलास उजागरे, प्रतीक लगड, संदीप दिवेकर ,महेंद्र दळवी, बाळासाहेब शिरसाठ, निखिल जगताप, जीवन लगड, बाळासाहेब लगड, विनायक जगताप, कमलेश लगड उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपसरपंच नितीन नलगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT