पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारात सेबीकडून मोठा बदल : आता शेअर बाजारातील मालकीची किंवा शेअर्सच्या हस्तांतरणाची प्रक्रिया एका व्यावसायिक दिवसात पूर्ण होईल. हा नियम पुढील वर्षापासून लागू होईल. यानुसार, व्यवहार पूर्ण झाल्याच्या एक दिवसानंतर शेअर्सच्या हस्तांतरणाची किंवा मालकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
सेबी स्टॉक एक्सचेंजेसना 1 जानेवारी 2022 पासून अस्तित्वात असलेल्या T+2 सायकलपेक्षा वेगाने T+1 ट्रेड सायकल पर्याय ऑफर करण्याची परवानगी देईल. याचा फायदा किरकोळ गुंतवणूकदारांना होईल. किरकोळ गुंतवणूकदार दीर्घ काळापासून याची मागणी करत आहेत.
सेबीने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, स्टॉक एक्सचेंजेस, कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटर्स सारख्या मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर, हे ठरवले गेले आहे की स्टॉक एक्सचेंजमध्ये T+1 किंवा T+2 सेटलमेंट सायकलची सुविधा असेल.
सेबीच्या नवीन परिपत्रकानुसार, कोणताही शेअर बाजार सर्व भागधारकांसाठी कोणत्याही शेअरसाठी T+1 सेटलमेंट सायकल निवडू शकतो.
मात्र, सेटलमेंट सायकल बदलण्यासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल.
सेबीच्या मते, नवीन प्रणाली 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. सेबीने क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीजला या संदर्भात आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
2003 मध्ये सेबीने 'T+3' वरून 'T+2' मध्ये करार पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी केला.
याआधी, असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया (ANMI), 900 हून अधिक स्टॉक ब्रोकर्स समूहाने, सेबीला लिहिलेल्या पत्रात T+1 सेटलमेंट सिस्टमबद्दल चिंता व्यक्त केली होती.
एएनएमआयने म्हटले होते की, कार्यप्रणाली आणि तांत्रिक आव्हानांचा सामना केल्याशिवाय नवीन प्रणाली लागू केली जाऊ नये.
हे ही वाचलं का?