मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस : मिलिंद नार्वेकर यांच्या हटके शुभेच्छा

backup backup

मुंबई : पुढारी ऑनलाईन :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस निमित्त विविध क्षेत्रातून शुभेच्छा येत आहेत. ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत १९९४ साली झालेल्या भेटीत शाखाप्रमुख ते पक्ष देईल ती जबाबदारी असा घडला तरुण… अशा शब्‍दात शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा

मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत खास शैलीत ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, "शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?" उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला.

तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा अशा आशयाच्या शुभेच्छा मिलिंद नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

अधिक वाचा

१९९२ साली मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातील गटप्रमुखाची जबाबदारी मिळवण्यासाठी नार्वेकर पोहोचले होते.

यावेळी आपल्‍याला वेगळीच संधी मिळेल, असे त्यांच्या मनातही नव्हते.

ते स्वत:च तेव्हा सुभाष देसाई यांचे बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते.

उद्धव ठाकरे यांनीनी नार्वेकर यांना विचारले, फक्त शाखाप्रमुख बनायचे आहे की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे.

मिलिंद नार्वेकर म्हणाले, तुम्ही सांगाल ते.

यानंतर मिलिंग नार्वेकर हे मातोश्रीवर पडेल ते काम करायचे. नंतर त्यांना १९९४ साली रितसर उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहायक म्हणून नेमण्यात आले.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांना सर्वच पक्षातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.राजकीय परिपक्वता आणि कर्तव्यदक्षता यांच्या समन्वयातून राज्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही मनोकामना व्यक्त करतो, असे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी आपल्‍या शुभेच्‍छा संदेशात म्‍हटले आहे.

हेही वाचलं का? 

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT