मुंबई

 Marathi Short Film : विधीमंडळात आज ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’ लघुपट

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे' हा लघुपट (Marathi Short Film) आज दुपारी ३ वाजता (दि.२२) लोकप्रतिनिधींना दाखविण्यात येणार आहे.

अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लघुपट 

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली  'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे'(Marathi Short Film) हा लघुपट तयार करण्यात आला आहे. मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस हा लघुपट दाखविण्याचा आला होता.

Marathi Short Film साडेदहा हजार पत्रे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी पत्र मोहीम राबविण्यात आली होती. साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात आली. आपली मराठी अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. विधिमंडळातील सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री, आमदार यांना हा २० मिनिटांचा लघुपट दाखविण्यात येणार आहे. प्रा. हरी नरके यांनी लिहलेल्या कथेवर आधारित असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले आहेत. संगीत कौशल इनामदार यांचे आहे. या लघुपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी, अभिनेता किशोर कदम, विद्याधर जोशी, विभावरी देशपांडे यांनी अभिनय केला आहे.

हेही वाचलं का ? 

SCROLL FOR NEXT