Karjat Shirur alternative route Pudhari
मुंबई

Karjat Shirur alternative route: कर्जत–शिरूर मार्गामुळे वेळ, इंधन वाचणार; 4.5 किमीसाठी भीमाशंकर इको झोन ठरणार अडथळा?

110 किमी अंतर कमी करणारा मार्ग वनपरवानगीअभावी रखडला; राज्य सरकार तोडगा काढणार का, याकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Karjat Shirur Highway Project Benefits Challenges Explained

कर्जत : हेमंत देशमुख

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तब्बल 36 तास बंद पडल्यानंतर राज्य सरकारने पर्यायी मार्ग म्हणून कर्जत-शिरूर या नव्या मार्गाची घोषणा केली आहे. मात्र हा महामार्ग भीमाशंकर इको सेन्सिटीव्ह झोनमुळे अडला आहे. साडेचार किमीचा मार्ग हा भीमाशंकर सेन्सिटीव्ह झोनमध्ये असून राज्य सरकार हा प्रश्न सोडवणार का, याकडे लक्ष आहे.

चार जिल्ह्यांना जोडणारा राज्य मार्ग 103 याचा विस्तार करून पनवेल, नेरे, महाळडुंगे, नेरळ, कशेळे, सावळे, तडपेवाडी, वारे आंबिवली, कुडे - घोटीवली, शिरगाव, तळेघर, भीमाशंकर, खेड, शिरूर असा हा मार्ग असून रायगड जिल्ह्यातील कर्जत ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यांना तो जोडणारा आहे. हा मार्ग राजगुरू नगर येथे पुणे नाशिक महामार्गाला शेदूण भीमाशंकर, शिरूर, अहमदनगर मार्गाला मिळतो.

तर दुसऱ्या बाजूला मुंबई एक्स्प्रेसलाही मिळतो. या मार्गामुळे भीमाशंकर, माथेरान या पर्यटन स्थळांवरही लवकर पोहोचणे सोपे होणार आहे. मात्र भीमाशंकर अभयारण्यातील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येणारा असल्याने हा अडथळा ठरत आहे. हा मार्ग झाल्यास इंधनाची मोठी बचत होणार असून कोकण मुंबईच्या पर्यटकांना भीमाशंकर - पुणे पोहोचणे सुलभ होणार आहे. हा मुंबईवरून पुण्यापर्यंत 170 किमीचा मार्ग आहे. या मार्गातही दोन पर्याय आहेत.

मुंबई - भोर - लोणावळा- तळेगाव - चाकण -खेड - वाडा शिरगाव - भीमाशंकर असा एक पर्याय आहे. तर दुसरा पर्याय मुंबई कल्याण, माळशेज, मंचर आणि भीमाशंकर असा दुसरा पर्याय आहे. हा मार्ग झाल्यास जवळपास 110 किमी अंतर कमी होऊ शकणार आहे. कारण मुंबई, कल्याण, माळशेज, मंचर, भीमाशंकर हा सध्याचा मार्ग 278 किलोमीटर आहे. तो आता 170 किमी होणार आहे. या मार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून रखडले आहे. पहिली प्रशासकीय मान्यता 2005 ला मिळाली होती.

2009 मध्ये वर्क ऑर्डर मिळाली आणि कर्जत कोटिंबे मार्ग पूर्ण झाला. मात्र पुढील साडेचार किमीचा मार्ग वनविभागाच्या परवानगी अभावी रखडला आहे. राज्य सरकारने या मार्गाची घोषणा आता केली असून राज्याच्या येत्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधी मिळणार का, याकडे आता लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT