Mumbai Mill Workers Housing: हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगारांचा निर्णायक एल्गार; 10 मार्चला विधान भवनावर धडक

सरकारी आश्वासने कागदावरच; संयुक्त लढा समितीचा पुन्हा आक्रमक आंदोलनाचा इशारा
Mumbai Mill Workers Housing
Mumbai Mill Workers HousingPudhari
Published on
Updated on

मुंबई : अनेक वर्षांपासून लढा देऊनही गिरणी कामगारांना मुंबईमध्ये हक्काची घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे 10 मार्च रोजी पुन्हा एकदा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार आहेत. शुक्रवारी झालेल्या संयुक्त लढा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Mill Workers Housing
Navi Mumbai Mayor Election: नवी मुंबई महापालिकेच्या 13व्या महापौरपदी सुजाता पाटील; भाजप सभागृहात नाराजीचे सूर

या पार्श्वभूमीवर परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात शुक्रवारी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Mumbai Mill Workers Housing
Eknath Khadse Bhosari land scam: भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी

यापूर्वी 9 जुलै 2025 रोजी विधान भवनावर आंदोलन केले होते. याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. मात्र ते कागदावरच राहिले. त्यामुळे ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर आठवण मोर्चा काढण्यात आला. मात्र सरकारकडून अद्यापपर्यंत सकारात्मक कार्यवाही झाली नसल्याने गिरणी कामगारांनी या बैठकीत संताप व्यक्त केला आहे.

Mumbai Mill Workers Housing
BMC Mahayuti: मुंबई पालिकेत शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाचा शिवसेनेला पाठिंबा, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

बैठकीला गोविंद मोहिते, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, विजय कुळकर्णी, सत्यवान उभे, हेमंत गोसावी, रमाकांत बने, ॲड. बबन मोरे, आनंद मोरे, ॲड.अरुण निंबाळकर, दिलीप सावंत, संतोष सावंत आदी उपस्थित होते.राज्य सरकारने गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याचा अध्यादेश काढावा व या पूर्वीचा नकारात्मक अध्यादेश रद्द करावा या प्रमुख मागणीसह मुंबईत बंद एनटीसी गिरण्यांच्या जागेवर, मिठागरांच्या जमीन, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जमिनीवर, बीडीडी चाळ पुनर्वसनात प्राधान्य द्यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news