मुंबई

devendra fadnavis : अभ्यासू, आक्रमक राजकारणी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशाच्या राजकारणात भाजपच्या ज्या काही महत्त्वाच्या नेत्यांचे नाव घेतले जाते त्यामध्‍ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते devendra fadnavis यांचे नाव घेतले जाते. विरोधी पक्षनेते devendra fadnavis यांचा राजकीय आलेख नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. आज त्‍यांचा वाढदिवस. यानिमित्त त्‍यांच्‍या राजकीय वाटचालीचा घेतेलेला संक्षिप्‍त आढावा…

अधिक वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास आणि आक्रमकता या जोरावर त्यांनी आपला राजकीय ठसा उमटवला आहे. सध्या राज्यात भाजपचे अग्रस्थानी असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

नगरसेवक ते मुख्यमंत्री

१९९९ ला देवेंद्र फडणवीस राजकीय कारकीर्द सुरू झाली.

नागपूर महापालिकेत १९९२ ला ते निवडूण आले आणि महापौरही झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

२२ जुलै, १९७० ला जन्मलेले फडणवीस शाळेत असताना आणीबाणी जाहीर झाली हाेती. त्यावेळी त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते.

त्‍यांच्‍या वडिलांना आणीबाणीत तुरुंगात टाकण्यात आले आणि त्याचा परिणाम देवेंद्र यांच्यावर झाला.

ते ज्या शाळेत जात होते त्या शाळेचे नावे इंदिरा गांधी यांच्या नावाने होते. त्यामुळे त्यांनी त्या शाळेत जाण्यास नकार दिला होता.

अधिक वाचा

वॉर्ड अध्यक्षांपासून सुरुवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असलेले देवेंद्र १९८९ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष झाले.

त्यानंतर १९९० मध्ये नागपूर शहर पश्चिमचे पदाधिकारी, १९९२ मध्ये नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष,

१९९४ मध्ये भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. २००१ मध्ये ते भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले.

२०१० ला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तर २०१३ ला ते प्रदेशाध्यक्ष झाले.

२०१४ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला बहर आला.

२०१९ मध्ये सत्ताबदलानंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि विविध विषयांवर अभ्यासू मते मांडून सरकारची कोंडी केली.

पक्षांतर्गत पकड आणि अभ्यास या दोन जमेच्या बाजू असल्याने फडणवीस यांनी आपली मांड पक्की केली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या काळात जलयुक्त शिवार अभियान आणि विविध शहरांतील मेट्रो प्रकल्प हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट होते.

अधिक वाचा:

फडणवीस यांची राजकीय कारकीर्द बहरत असताना त्यांना अनेक संघर्षही करावे लागले.

मोदीपर्व येण्याआधी भाजपमध्ये अडवाणी पर्व होते. राजनाथ सिंग राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने राज्यात एकनाथ खडसे सांगतील ती पूर्व दिशा असे. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष बनण्यासाठी खडसे यांना फडणवीस यांच्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले.

तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत खडसे यांच्याबरोबर पंकजा मुंडेही होत्या मात्र, या सगळ्यात फडणवीस उजवे ठरले. त्यांनी पक्षांतर्गत आणि राज्याच्या राजकारणात जम बसविला.

शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला होता.

संघटनात्मक बांधणी, हजरजबाबीपणा, अभ्यासू, चाणाक्ष , भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेली इमेज, पक्षश्रेष्ठींच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्यात आलेले यश या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासमोर दुष्काळ, महापुरासारखी मोठी संकटे आली. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदील होते.

अधिक वाचा

मात्र, कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्यांनी दिलासा दिला. त्यांच्या काळात रायगड प्राधिकरणासारखा विषय मार्गी लागल्याने रायगड पुनर्विकासाला वेग आला.

मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाच शिवाय त्याबबरोबर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, मराठा मुलांसाठी वसतिगृहे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अर्थसहाय्य असे अनेक निर्णय त्यांनी घेतले.

आक्रमक विरोधी पक्षनेते

२०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंततर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. कोरोनाच्या आडून सरकारने काढलेल्या पळवाटा त्यांनी रोखून धरल्या.

कोरोना काळातही त्यांनी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र दौरा केला.

बार उघडे आणि मंदिरे बंद असे सांगत मंदिरे उघडण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सचिन वाझे प्रकरण त्यांनी लावून धरले.

या एकाच अधिवेशनात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणत राजीनामा देण्यास भाग पाडले.

उच्चविद्याविभूषित राजकारणी

फडणवीस यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. .एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा केला आहे. १९९९ ते आजर्पंत विधिमंडळ सदस्यपदी निवडून आले.

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीवर त्यांनी काम केले आहे.

आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण केले आहे. इंधन, ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल आदी विषयांवर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांना निमंत्रण दिले आहे.

ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजनचे ते सचिव आहेत.

नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्यही आहेत.

नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष आहेत.

नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार त्यांना दिला आहे.

रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार, मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

हेही वाचलेत का: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT