मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार कलम 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम 206 अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे महापालिकेने नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या bआत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करत असतात.
तरीही मालमत्ता कर न भरल्यास डिमांड लेटर पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास 21 दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.
9 फेब्रुवारी रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या मालमत्ताधारकांची यादी
मेसर्स रघुवंशी मील्स लि. (जी दक्षिण विभाग) - 140 कोटी 61 लाख 68,630 रु.
मेसर्स राजहंस असोसिएट्स (एस विभाग) - 47 कोटी 02 लाख 99,687 रुपये
मेसर्स आशापदारा डेव्हलपर्स (एच पूर्व विभाग) - 44 कोटी 87 लाख 80,005 रुपये
मेसर्स सुमेर बिल्टकॉर्प प्रा. लि. (ई विभाग) - 39 कोटी 30 लाख 47 हजार 491 रुपये
समीर एन भोजवानी (के पश्चिम विभाग) - 31 कोटी 73 लाख 23 हजार 416 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 29 कोटी 12 लाख 21 हजार 635 रुपये
मेसर्स आमीर पार्कस् ॲण्ड ॲम्युझमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - 27 कोटी 79 लाख 55 हजार 039 रुपये
मेसर्स डीबीएस रिऍल्टी (एल विभाग) - 22 कोटी 42 लाख 60 हजार 063 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 22 कोटी 40 लाख 48 हजार 485 रुपये
मेसर्स एस.डी. कॉर्पोरेशन (आर दक्षिण विभाग) - 21 कोटी 43 लाख 42,109 रुपये
श्री. ए.आर. जाफर (डी विभाग) - 21 कोटी 3 लाख 36 हजार 752 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 56 लाख 33 हजार 841 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 56 लाख 30,421 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 55 लाख 62 हजार 036 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 54 लाख 18 हजार 426 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 54 लाख 04 हजार 749 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 20 कोटी 53 लाख 46 हजार 621 रुपये
मेसर्स गॅलेक्सी कॉर्पोरेशन 10 प्लॅनेट (एच पश्चिम विभाग) - 20 कोटी 22 लाख 82 हजार 662 रुपये
मेसर्स डीबीएस रिएॲल्टी (एल विभाग) - 19 कोटी 10 लाख 41 हजार 320 रुपये
मेसर्स डीबीएस रिॲल्टी (एल विभाग) - 18 कोटी 67 लाख 69 हजार 402 रुपये