बीड

Beed theft news : भरदिवसा प्राध्यापकाचे घर फोडले; २० हजारांच्या रोकडीसह २ लाखांचे पाणी तपासणी यंत्र लंपास

चोरटा सीसीटीव्हीत कैद; आरोपीला जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बु. येथे भरदिवसा अज्ञात चोरट्याने एका बाळासाहेब गोरे नामक प्राध्यापकाच्या बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २ लाख २० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली. या चोरीत २० हजार रुपयांची रोकड आणि अंदाजे २ लाख रुपये किमतीचे पाणी तपासणी यंत्र लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापक गोरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप कात्रीच्या साहाय्याने तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची झडती घेत २० हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे पाणी तपासणी यंत्र चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच घरमालकाने पोलिसांना कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित चोरटा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आहे.

भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे शेरी बु. व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला तातडीने अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून,संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. चोरट्यांनी कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रुपयांची रोकड तसेच भूगर्भातील पाणी तपासणीसाठी वापरण्यात येणारे जर्मनी टेक्नॉलॉजीचे सुमारे २ लाख ८० हजार रुपचे किमतीचे यंत्र असा लाखोंचा ऐवज लांबविला. चोरी केल्यानंतर तिन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले.

विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित प्राध्यापक गोरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप कात्रीच्या साहाय्याने तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची झडती घेत २० हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे पाणी तपासणी यंत्र चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच घरमालकाने पोलिसांना कळविले.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित चोरटा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आहे. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे शेरी बु. व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला तातडीने अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून,संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

भरदिवसा घरफोडीने ग्रामस्थांमध्ये भीती....

शेरी बु. येथे भरदिवसा प्राध्यापकाच्या घरावर झालेल्या घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरट्याने दिवसाढवळ्या कुलूप तोडून घरातील रोकड व लाखो रुपयांचे पाणी तपासणी यंत्र चोरून नेल्याने गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याच्या आधारे आरोपीला तातडीने अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच गावात रात्रीसह दिवसा देखील पोलिस गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT