Jalgaon crime news: जळगाव जिल्ह्यात चोरांचा हैदोस! जामनेर, पाचोरा आणि जळगावात धाडसी चोऱ्या; लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

जळगाव जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी घरफोडी आणि चोरी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
theft
theftPudhari
Published on
Updated on

Jalgaon theft news

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी घरफोडी आणि चोरी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. जामनेरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून, पाचोऱ्यात भरदिवसा घरात घुसून, तर जळगाव शहरात बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

theft
Sangli burglary: सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला

जामनेरमध्ये बंद घर फोडून ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास

जामनेर येथील वाकी रोडवरील दर्शन पार्क भागात राहणाऱ्या वर्षा ज्ञानेश्वर पाटील (वय ४०) या ४ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुटुंबासह पुणे येथे गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ५ जुलैच्या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या कडी-कोंड्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये १५ हजार रुपयांची सोन्याची मंगळपोत (३.५ ग्रॅमच्या दोन वाट्या व ३ ग्रॅमचे सोन्याचे कारले मणी), १४ हजार रुपयांची सोन्याची पाईप मणी पोत (६ ग्रॅम), तसेच चांदीचे जोडवे, जोडपायल्या आणि ३० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. ६ जुलै रोजी सकाळी वर्षा पाटील या परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जामनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन काळे (मो. ७९७२१९३६७७) करत आहेत.

पाचोऱ्यात भरदिवसा घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि ५० हजारांची रोकड चोरीला

पाचोरा शहरातील देशमुख वाडी (विसपुते हॉस्पिटलजवळ) येथे राहणारे फरसाण व्यावसायिक गणेश धुडकू भोई (वय ४८) यांच्या घरात भरदिवसा धाडसी चोरी झाली. ६ जुलै रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉईन आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम (ज्यात ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा होत्या) असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२७/२०२६, BNS कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावात बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लांबवले

यावल तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी दगडू संतोष पाटील (वय ५४) हे आपल्या पत्नी विजया पाटील (वय ४७) यांच्यासह प्रवास करत असताना जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विजया पाटील या बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची, १८ हजार रुपये किमतीची सोन्याची मणी मंगळसूत्राची पोत अत्यंत चलाखीने चोरून नेली. याप्रकरणी दगडू पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१२/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुस्तम तडवी करत आहेत.

तिन्ही घटनांतील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मात्र, या लागोपाठ झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

theft
Jamner Burglary Case | जामनेरमध्ये 12 लाखांच्या घरफोडीचा छडा; दोन आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news