मराठवाडा

बीड : उसाच्या शेतात गांजाची लागवड; शेतकरी पोलीसांच्या ताब्यात

अविनाश सुतार

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तलवाडा येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पथकासह आज (दि.१८) धाड टाकली. यावेळी लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील तलवाडा शिवारात त्वरिता देवीच्या पायथ्याशी बाळू अंकुश खवाटे यांची शेती आहे. त्यांनी उसात गांजाची लागवड केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळताच त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, प्रताप नवघरे यांना सोबत घेऊन पथकासह खवाटे यांच्या शेतात धाड टाकली.

यावेळी उसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास २० ते २५ गांजाची रोपे जवळपास ५ ते ६ फूट वाढलेली आढळून आली. ही सर्व रोपे पोलिसांनी जप्त करत आरोपी बाळू खवाटे यांना ताब्यात घेतले. कारवाई केलेल्या पथकात उपनिरीक्षक बाळासाहेब भुवर, सचिन अलकट, मंडळ अधिकारी, तलाठी राहुल गायकवाड आदींनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT