भंडारा : एमबीबीएस प्रवेश देण्याची बतावणी करुन पालक आणि विद्यार्थिनीला २० लाखांचा गंडा | पुढारी

भंडारा : एमबीबीएस प्रवेश देण्याची बतावणी करुन पालक आणि विद्यार्थिनीला २० लाखांचा गंडा

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : एमबीबीएस प्रवेश देण्याची बतावणी करुन पालक आणि विद्यार्थिनीला २० लाख रुपयांनी फसविले. ही घटना भंडा-यात घडली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी मुंबईतील चौघाविरूदृध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भंडारा शहरातील सहकारनगर येथील एका मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा पालकांनी गुगलवर कॉलेजबाबत माहिती शोधली. त्‍यानंतर त्यांचा संपर्क विजय अग्रवाल नावाच्या व्यक्तीशी झाला. त्‍यांनी पालक आणि विद्यार्थीनीला मुंबईला बोलवले. त्‍यावेळीही ते तिथे गेले. विजय अग्रवाल याने अभय कुमार या व्यक्तीचा नंबर देऊन त्यांच्याशी अ‍ॅडमिशनबाबत बोलण्यास सांगितले. एका ऑफीसमध्ये पंधरे नामक व्यक्तीशी अ‍ॅडमिशन प्रोसीजर व पैशाबद्दल चर्चा केली.

यावेळी आरोपींनी आम्हीच महाराष्ट्रात एमबीबीएसमध्ये अ‍ॅडमिशन करतो, असे खोटे सांगून अ‍ॅडमिशन करतो असे सांगितले. प्रवेशासाठी आरोपींनी पालकाकडून २० लाख रुपये घेतले. एवढेच नव्हे तर त्यांना अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल मेडीकल कॉलेजचे खोटे अपॉईंटमेंट लेटर देऊन कॉलेजच्या डीनचे खोट्या सहीचे पत्रसुद्धा दिले. यानंतर विद्यार्थी संबंधीत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेले असता त्‍यांची फसवणूक झाली आहे असे लक्षात आले. त्‍यानंतर पालकांनी भंडारा पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय अग्रवाल, अभय कुमार, पंधरे, राहूल सिंग सर्व रा. मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा  

गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीने सिने अभिनेते सयाजी शिंदे भावूक!

Back to top button