मराठवाडा

बीड : ४२ शिवसैनिकांनी मुंडन करत बंडखोर आमदारांचा केला निषेध

backup backup

बीड; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्यासह ४२ आमदारांनी बंड केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मुंडन करुन निषेध व्यक्त केला. यावेळी जवळपास ४२ शिवसैनिकांनी मुंडन केले. बीड शहरातील शिवसेना जिल्हा संघटक रतन गुजर यांच्या नेतृत्त्‍वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना धानोरा रोड येथील जिल्हासंघटक रतन गुजर म्हणाले, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी महत्वाची पदे दिली. मोठी पदे उपभोगूनही ते शिवसेनेला त्रास देत आहेत. 'सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नाही' असे म्हणत पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याची ताकत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये आहे. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार आहोत. गद्दारांना धडा शिकवत नव्या शिलेदारांना विजयी करू असेही गुजर म्हणाले.

कोणी कुठेही गेले तरी सच्चा आणि सामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख हनुमान भैरवाड, शिवाजी माने, चंद्रशेखर कवडे, आबा मगर, सुरेश जगताप, बाळासाहेब तांदळे, राजाभाऊ गायकवाड, लक्ष्मण लांडगे, आबा मगर, अशोक मोरे, रफिक पठाण, खाजा भाई शेख, कृष्णा सावंत, अर्जुन मांडे, देवराव भोसले, राधा कृष्ण अर्जुन निर्मळ, महादेव जाधव, राजाभाऊ पिंगळे, महादेव जाधव, प्रकाश गोकुळे, प्रकाश वाघमारे, मसु आबा लांडगे, संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT