पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

molestation
molestation
Published on
Updated on

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यामध्ये महिला गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. हा प्रकार जुलै 2018 ते जानेवारी 2022 या कालावधीत डुडुळगाव, मोशी येथे घडला. राकेश सुनीलराव हिबारे (33, रा. भोसरी. मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 23) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिच्यावर जबरदस्तीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, महिला गरोदर राहिली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2020 रोजी महिलेला मुलगा झाला.

महिलेने आरोपीकडे लग्न करण्याबाबत वारंवार विचारणा केली. मात्र, तरीही आरोपीने महिलेसोबत लग्न केले नाही. दरम्यान, आरोपीने त्याच्या मूळगावी कर्नाटक येथील दुसर्‍या मुलीशी लग्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्हा दिघी पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news