कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रव्यवहाराला शंभर वर्षे पूर्ण

अमृता चौगुले

राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेह सर्व परिचित आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच नात्यातील एका गोष्टीला तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. ती अनोखी गोष्ट म्हणजे त्यांच्यामधील पत्रव्यवहार. होय शाहू महाराज आणि आंबेडकर यांच्या पत्रव्यवहाराला १० ऑगस्ट रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जातात. शाहू महाराजांच्या प्रेरणेमुळे व त्यांच्या मदतीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य करता आले. तसेच ते पुढे जाऊन त्यांनी संपूर्ण भारताचेच नेतृत्व केले. शाहू महाजांच्या प्रेरणेमुळेच महाराजांनी आपल्या करवीर संस्थांनात लागू केलेल्या अनेक कायद्यांना पुढे जाऊन बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेत समावेश केला. त्यामुळे यांच्यातील स्नेहाची ओळख संपूर्ण भारताला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करवीर संस्थानचे दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांना लिहलेले ऐतिहासिक पत्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये असताना त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. ही मदत बाबासाहेबांना मिळण्यात करवीर संस्थानच्या दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांनी पुढाकार घेतला होता.

याबाबतची अप्रकाशित पत्रे दळवी यांच्या खासगी दफ्तरातून काही वर्षापूर्वी मिळाली असून, या पत्रव्यवहाराला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. दहा ऑगस्ट १९२१ रोजी यातील एक पत्र बाबासाहेबांनी दत्तोबा दळवी यांना पाठविले होते.

बाबासाहेबांनी दळवींना लिहिलेल्या पत्रात शाहू महाराजांना विनंती करून लवकरात लवकर पैसे पाठवण्याची लंडनहून विनंती केली आहे आणि त्यानंतर राजर्षी शाहूंनी त्यांना मदतही केली.

राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या आर्थिक मदतीमुळे बाबासाहेबांनी आपले परदेशातील शिक्षण पूर्ण केले. पुढे बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज उद्धारासाठी केला. तसेच पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा प्रज्ञासूर्य बनले.

SCROLL FOR NEXT