पुढारी’ एज्यु-दिशा : परदेशातील शिक्षणाच्या संधी विषयावर दिलीप ओक यांचे थोड्याच वेळात मार्गदर्शन | पुढारी

पुढारी’ एज्यु-दिशा : परदेशातील शिक्षणाच्या संधी विषयावर दिलीप ओक यांचे थोड्याच वेळात मार्गदर्शन

पुढारी ऑनलाईन डेस्क : दहावी-बारावीनंतर नेमके कोणते करिअर निवडायचे आणि त्यासाठी मार्गदर्शन कोण करणार, या संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी’ एज्यु-दिशा ऑनलाइन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मार्गदर्शनाची गुरुकिल्लीच ठरत आहे. विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर करिअर घडविण्यासाठीचे मार्गदर्शन आणि
त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकविणार्‍या शैक्षणिक संस्था यांची ओळख होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

आज सायंकाळी ५ वाजता दिलीप ओक (फाउंडर ऑफ ओकस ॲकॅडमी) परदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

असे पाहता येईल एज्यु-दिशा प्रदर्शन

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत. www.pudhariexpo.com या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल, असे दोन पर्याय असतील. यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील. त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल. त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

Back to top button