कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महावितरण कनिष्ठ अभियंत्याला तीन हजाराची लाच घेता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदारच्या कंपनीमार्फत सोलर कनेक्शनचे नेट मिटर बसवण्यासाठी त्याने ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.
ही लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
महावितरण कनिष्ठ अभियंत्याचे मनोज दादाराव भोरगे (वय २५, सध्या रा. मलकापूर, मूळ कल्लाळ ता.जि.नांदेड) असे नाव आहे. शाहुवाडी तालुक्यातील वारुळ महावितरण कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा :
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, संजीव बंबरगेकर, सुनिल घोसाळकर,कृष्णात पाटील, रूपेश माने या पथकाने कारवाई केली.
हेही वाचले का?
पाहा फोटोज्
[visual_portfolio id="4104"]