कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथे पूरग्रस्त लोकांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो लोक पुरग्रस्त झाले आहेत.
अधिक वाचा –
कोल्हापूर येथे पूरग्रस्त लोकांना अनेक ठिकठिकाणच्या इमारती व अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यांवर सुरक्षित थांबले आहेत. या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे.
अधिक वाचा-
नागाळा पार्क परिसरातील अशा पूरग्रस्तांना दै. 'पुढारी' रिलीफ फाऊंडेशनच्यावतीने बोटींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रविवारी करण्यात आला.
यावेळी विश्वविजय खानविलकर, अॅड. गुलाबराव घोरपडे, जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे, आपत्ती व्यवस्थापन 'आपदा सखी' संघाच्या शुभांगी घराळे उपस्थित होते.
अधिक वाचा –
दरम्यान 'पुढारी' व रॉबिनहूड आर्मी यांच्यावतीने महामार्गावर अडकलेल्या वाहनातील सर्व प्रवाशांना जेवण, बिस्कीट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा डिसास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्यावतीने शहरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय जैन सोशल ग्रुप (मेन) च्यावतीने मुक्या जनावरांंनाही चारा पुरवठा करण्यात आला.
जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांना दैनिक 'पुढारी'च्या वतीने बचावकार्यासाठी रबरी बोटी देण्यात आल्या आहेत. बचावकार्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यासोबत वीज, मोबाइल नेटवर्क व पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या बोटींचा वापर होत आहे. -प्रसाद संकपाळ (जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी)
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा | Flood Rescue Operation