Karnataka Assembly  
कोल्हापूर

Karnataka Assembly : कोल्हापूरमध्ये ध्वज जाळल्याप्रकरणी जनता दल आमदारांचा गोंधळ

स्वालिया न. शिकलगार
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कन्नड भाषेचा कोल्हापूरमध्ये ध्वज जाळल्याप्रकरणी जनता दल आमदारांनी विधानसभेत (Karnataka Assembly) गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना ट्रॅक्टरसहीत 'सुवर्णसंधी'मध्ये प्रवेश न दिल्यानेही काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुऴे पंधरा मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. (Karnataka Assembly)

दरम्यान, मराठा विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपयांचा निधी देण्याची बाबागौडा पाटील यांनी विधानसभेत मागणी केली.

कोल्हापुरातील कुरुंदवाड येथे निषेध

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे भगवा ध्वज जाळल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने कुरुंदवाड येथील बसवेश्वर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. येथे कन्नड वेदिका संघटनेचा प्रतिकात्मक लाल आणि पिवळा रंगाचा ध्वजाच्या पुतळ्याला जोडा मारून पुतळा दहन करण्यात आला. बोंबठोक करत जोरदार निषेध नोंदवत हा प्रकार कर्नाटक सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्‌ केला. कर्नाटक सरकारचा धिक्कार असोच्या घोषणा देत त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांच्या अंगावर शाईफेक केल्याच्या व कन्नड वेदिकांनी शिवसेनेचा ध्वज जाळल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या नेतृत्वाखाली कन्नड वेदिका संघटनेचा प्रतिकात्मक ध्वज पेटवून निषेध केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT