कोकण

संजय राऊतांनी नारायण राणेंना कोंबडीवरून डिवचले!

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नारायण राणेंना कोंबडीवरून डिवचले : नारायण राणे यांना सातत्याने डिवचण्यासाठी शिवसेनेकडून कोंबडी चोर शब्दाचा वापर केला जातो.

जेव्हा जेव्हा नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष तेव्हा दोन्हीबाजूने शेलक्या शब्दांचा वापर हे समीकरण झालं आहे. काल (ता.२५) नारायण राणे यांना उचलण्यापूर्वी आणि उचल्यानंतर टीका करण्यासाठी कोंबडी शब्दाचा पुरेपूर वापर सोशल मीडियात झाला.

नारायण राणेंना कोंबडीवरून डिवचले

आता याच कोंबडीवरून नारायण राणे यांना शिवसेनेने डिवचले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टवरून राणेंची तुलना एक प्रकारे गावठी कोंबडीशी केली आहे.

त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये गावठी कोंबडी वाघाने तोंडात धरल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना आजचा दिवस थोडक्यात!!!!! अशी कॅप्शन दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता नव्या वादाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. शिवराळ भाषा ते एकेरी उल्लेख ते मुख्यमंत्र्यांना कानशिलात असा हा प्रवास आतापर्यंत झाला आहे.

नारायण राणेंना अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

राणे यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले, ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, भाजपचेही कार्यकर्ते भिडले.

असे राजकीय धुमशान सुरू असतानाच रात्री उशिरा महाड न्यायालयाने राणे यांची सशर्त जामिनावर सुटकाही केली. असा गुन्हा पुन्हा करणार नाही, अशी लेखी हमी राणे यांनी न्यायालयास दिली. याशिवाय इतरही अटी घालण्यात आल्या आहेत.

रात्री उशिरा संपूर्ण राज्याचे लक्ष महाड न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते. न्यायालयाने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगवर सुनावणी घेण्यास नकार देत राणे यांना प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश दिले.

राणे यांच्या मुख्यमंत्रीविरोधी वक्‍तव्यामागे कट असल्याचा आरोप करीत सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली.
मात्र राणेंच्या वकिलांचा युक्‍तिवाद ग्राह्य धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांनी राणे यांना न्यायालयीन कोठडी दिली. पाठोपाठ जामीनही मंजूर झाला.

सोमवारी रायगडमधील महाड येथील सभेमध्ये सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात ना. राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी ना. राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले.

सुरुवातीला नाशिक, पुणे व महाड येथे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर राज्यभर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.

हे ही वाचलं का?

https://youtu.be/64iOYYZztvo

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT