अहमदनगर

मराठा आरक्षणासाठी नगरमध्ये ‘रास्ता रोको’

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि. 13) शहरातील कायनेटिक चौकात 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह अंतरवाली सराटी (जालना) येेथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा व मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ हे आंदोलन होता. मागण्या मान्य न झाल्यास नगरमध्ये साखळी उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

संबंधित बातम्या :

…तर राजकीय नेत्यांचे पित्र घालणार
आम्ही आता आमच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. जरांगे पाटलांनी दिलेली 30 दिवसांची मुदत 13 ऑक्टोबरला संपत आहे. त्या दिवशी पितृअमावास्या असून, मागण्या मान्य न झाल्यास सर्व राजकीय राजकीय नेत्यांचे पित्र घालणार असल्याचे आंदोलकर्ते राजेंद्र काळे म्हणाले.

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण सरकारने एका महिन्याच्या आत द्यावे, अन्यथा महिन्याचा अल्टिमेटम संपल्यावर साखळी उपोषणाच्या माध्यमातून हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल. अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचा निर्धारही विविध वक्त्यांनी व्यक्त केला. त्यासोबतच अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला पाच अटींसह एका महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत सरकारने समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे वक्त्यांनी ठणकावून सांगितले. 14 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात साखळी उपोषणास सुरुवात करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सर्वच पक्ष सत्तेत; तरीही… : आमदार जगताप
मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण, अजूनपर्यंत त्याला यश आले नाही. आता जालना येथील मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा देऊन आरक्षणाचा लढा तीव्र करावा, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली. गेल्या पाच वर्षांत सत्तेत सर्वच पक्ष सामील झाले; मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. आता मनोज जरांगेंच्या नेतृत्वात ही लढाई आपल्याला यशस्वी करायची आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT